राज्यमंत्री विजय शिवतारे प्रकृती अस्वस्थामुळे लीलावतीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सातारा - जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेना प्रवक्‍ते जलसंपदा व संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय शिवतारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

शिवतारे यांनी गुरुवारी शासकीय बैठका व मतदारसंघातील नियोजित सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी देखील पुरंदर तालुक्‍यातील कोथळे, सासवड येथे त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. सासवड येथील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठी जाऊन डॉ. भास्कर अत्राम आणि डॉ. संजय रावळ यांच्याकडे विविध तपासण्या त्यांनी केल्या. या वेळी ईसीजी आलेखामध्ये शिवतारे यांना तीन ते चार दिवसांपूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे दिसून आले. 

डॉ. अत्राम यांनी तत्काळ लीलावती रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णालय प्रशासनाला या बाबींची कल्पना दिली. त्यानुसार शिवतारे कुटुंबीयांनी त्यांना "लीलावती'मध्ये दाखल केले. गरज पडल्यास शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यांना भेटण्यास रुग्णालय प्रशासनाकडून परवानगी नसल्याने कार्यकर्ते, हितचिंतकांनी रुग्णालयात गर्दी करू नये, अशी शिवतारे कुटुंबीयांनी विनंती केली आहे, अशी माहिती त्यांचे स्वीय सहायक माणिक निंबाळकर यांनी दिली. 

उपोषणाचा परिणाम 
2012 मध्ये पुरंदर तालुक्‍याच्या पाणीप्रश्नी शिवतारे यांनी सासवडच्या पालखी मैदानावर सलग आठ दिवस उपोषण केले होते. या उपोषणामुळे शिवतारे यांच्या किडनीवर परिणाम झाला. नंतरच्या काळात किडनीचे हेच दुखणे उफाळून आल्याने दोनदा शिवतारे यांना लीलावतीत दाखल केले होते. 

Web Title: satara news vijay shivtare Lilavati Hospital