गावागावांत शक्तिप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या जाहीर निवडणूक प्रचाराला आज रात्री पूर्णविराम मिळाला. आज दिवसभर उमेदवारांनी आपापल्या गटांत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मतदानाला अजूनही एक दिवस असल्याने त्याचा फायदा उठविण्यासाठी नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांकडून छुपी रणनीती अवलंबली जाईल. आगामी 24 तासांत पैशाचा गैरवापर होण्याची शक्‍यता असल्याने वातावरणही "टाइट' होणार आहे. मतदारांना आपल्याकडे वळविणे, मतदानाचा "टक्‍का' राखण्यासाठी उमेदवारांसाठी "जागते रहो', तर सुज्ञ मतदारांसाठी "रात्र वैऱ्याची आहे' अशी स्थिती होणार आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हा परिषदेच्या 64 गटांसाठी 287, तर पंचायत समित्यांच्या 128 जागांसाठी 530 उमेदवार रिंगणात आहेत. यंदा प्रथमच राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेने स्वबळ आजमावल्याने उमेदवारीचे पेव फुटले आहे. काही ठिकाणच्या आघाड्या, युती वगळता जिल्हाभरात चौरंगी लढत होत आहे. 13 फेब्रुवारी रोजी अर्ज माघार प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. मुख्यमंत्री, मंत्री, सभापती, विरोधी पक्षनेते, माजी मंत्री, आजी-माजी आमदार आदींच्या सभांनी वातावरण ढवळून निघाले. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या प्रहारांनी नेतेमंडळी, उमेदवार घायाळ झाले. अखेर जाहीर प्रचारांना आज पूर्णविराम मिळाला. 

मंगळवारी (ता. 21) रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या हाती सोमवारी दिवस-रात्रभर छुप्या प्रचाराची संधी आहे. याच टप्प्यात मतांची "गोळा बेरीज' होत असल्याने उमेदवारांकडून प्रचाराचा "सर्जिकल स्ट्राइक' केला जाणार आहे. त्यादृष्टीने कोणी कोठे फिल्डिंग लावायची, याची आखणीही उमेदवार व त्यांच्या प्रचार यंत्रणेने केली आहे. कोणाला "लक्ष्मी दर्शन' द्यायचे, यासाठीही प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. अनेकांनी तर "लक्ष्मी दर्शना'चा योग असल्याने सर्वच "मंदिरा'त रांगा लावल्याची तयारी ठेवली आहे. उमेदवार, मतदारांसाठी राजकीय भवितव्य घडविणारी ही रात्र असल्याने "जागते रहो,' असेच म्हणावे लागेल. 

Web Title: satara zp election