Shocking : मनोरंजानासाठी काही डॉक्टर करतायत महिलांची मागणी 

As per Saathi Organization Report Few Doctors are demand women for entertainment
As per Saathi Organization Report Few Doctors are demand women for entertainment

पुणे : कमिशनऐवजी डॉक्टरांची औषध कंपन्यांकडे महिलांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. पुण्यातील साथी संस्थेने हा अहवाल प्रसिध्द केला आहे. तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस मिळवून देतो त्याबदल्यात तुम्ही मला जास्तीत जास्त कमिशन द्या, परदेश वारीचं पॅकेज द्या, अशा मागण्या डॉक्टरांकडून औषध विक्री करणाऱ्या सेल्समनकडे केल्या जातात. तर काही डॉक्टर परदेशात कॉन्फरन्ससाठी सोबत अभिनेत्री पाहिजे अशी मागणी करतात.

विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीच्या धडकेत एक ठार 

 डॉ अरुण गद्रे यांनी अहवाल 72 पान असलेला अहवला तयार केला असून, सरकारने याबाबत कायदा करावा, अशी मागणी गद्रे यांनी केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक या महाराष्ट्रातल्या तीन शहरांसह देशातल्या लखनौ, कोलकाता, हैदराबाद अशा एकूण सहा शहरांमध्ये साथीने सर्वेक्षण केले आणि अनेक मुलाखती घेतल्या. त्यानंतर सादर केलेल्या अहवालात वैद्यकीय व्यवसायाच्या काळ्या बाजू समोर आल्या आहेत. कोणतीही मागणी न करणारे, तसेच बनावट औषधांची विक्री न करणारे काही डॉक्टर समाजात कार्यरत असल्याची बाबदेखील 'साथी'ने सर्वेक्षणात नमूद केली आहे.

चक्क ! ICUमध्येच केला त्यांनी विवाह पण...

डॉक्टर अरुण गद्रे, डॉक्टर अर्चना दिवटे या दोन डॉक्टरांनी मुंबई-पुणे-नाशिकसह देशातल्या सहा शहरात अभ्यास केला. त्यासाठी फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या (FMRAI) वैद्यकीय प्रतिनिधींची मदत घेतली. या अहवालत एक इंग्रजी भाषेत नोंद करण्यात आली आहे, ''some doctors who give huge business demand women for entertainment and these demands are met'' म्हणजेच, ''औषध कंपन्यांना मोठा बिझनेस देणाऱ्या काही डाँक्टरांनी औषध कंपन्यांकडे मनोरंजनासाठी महिलांची मागणी केली आणि त्या पुर्ण केल्या आहेत.''  त्यामुळे याविरोधात सरकारने कायदा बनवावा अशी मागणी करणार आहोत असे गद्रे यांनी सांगितले. 

पिंपरी : फुगेवाडी दुर्घटनेतील जवानांना आज 'डिस्चार्ज'  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com