Sindhudurg District Bank Election: दहशत, धनशक्तीमुळेच भाजप विजयी

सतीश सावंत : थकबाकीदारांच्या नेत्वृत्वाखालील पॅनेल जिंकल्याचे दुःख
Satish Savant
Satish SavantEsakal

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा बँकेच्या (Sindhudurg District Bank Election) निवडणुकीत धनशक्तीचा आणि दहशतीचा वापर झाल्यानी मतदारांनी नाहक त्रास नको म्हणून आमच्या विरोधी मतदान केले. आमचे कणकवली आणि देवगडचे मतदार गायब करून भाजपने हे यश मिळवले आहे. दैवाची साथ मिळाली नाही म्हणून माझा पराभव झाला. पराभवाच्या दुःखापेक्षा थकीत कर्जदारांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मतदारांनी निवडून दिले याचे अधिक दुःख आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत (Satish Savant) यांनी निवडणूक निकालानंतर दिली.कणकवली आणि देवगड (Kankavli, Devgad) येथील आमच्या मतदार असलेल्या कार्यकर्त्यांना गायब करण्यात आले. त्यांचे मतदान न झाल्याने आम्हाला पराभव स्वीकारावा लागला.

मला आणि माझ्या विरोधी उमेदवाराला सम-समान मते असताना मला नशिबाची साथ मिळाली नसल्याने चिठ्ठीद्वारे झालेल्या निकालात मला पराभव पत्करावा लागला. माझ्या पराभवाच्या दुःखापेक्षा गेल्या साडे सहा वर्षात चांगले काम करूनही आणि एकही तक्रार नसताना थकीत कर्जदार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मतदारांनी निवडून दिले याचे दुःख अधिक आहे. महाविकास आघाडीचे ८ उमेदवार निवडून आले आहेत.ते बँकेच्या कामकाजावर नक्कीच अंकुश ठेवतील .चुकीचे काम आणि बँकेचे नुकसान होऊ देणार नाहीत."

Summary

नशिबाची साथ मिळाली नसल्याने चिठ्ठीद्वारे झालेल्या निकालात मला पराभव पत्करावा लागला.

Satish Savant
Sindhudurg : 3 पक्ष एकत्र असताना पराभूत झाले, याला अक्कल म्हणतात

जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी काल मतदान तर आज ३१ मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला ११ आणि महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. भाजपने जिल्हा बँकेवर एक हाती सत्ता काबीज केली आहे. तर विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष ,यांच्यासह तब्बल दहा संचालकांना पराभव पत्करावा लागला. या निकालानंतर बोलताना पॅनल प्रमुख सावंत म्हणाले, "भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी धनशक्ती आणि दहशतीचा वापर केला. आमच्या कार्यकर्त्यावर हल्ला करून मतदारांमध्ये दहशत निर्माण केली. या भीतीपोटी नाहक त्रास नको म्हणून मतदारांनी मनात नसताना आमच्या विरोधी मतदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com