युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजीत तांबेंची शक्‍यता

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe

नाशिक : युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यपाच्या निवडणुकीत देशभरात सर्वाधीक संघर्ष आणि गटबाजीचे प्रदर्शन होते. त्यावर महाराष्ट्रातील वरीष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत नवा पायंडा पाडला आहे. यातुन पुढे आलेल्या फॉर्मुल्यानुसार युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजीत तांबे यांची निवड होण्याची शक्‍यता आहे. अध्यक्षपदासह उर्वरीत पदांसाठीची निवडणूक प्रक्रीया उद्या (ता.9) पासून सुरू होत आहे. 

राज्यातील युवक कॉंग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी पुणे विश्रामगृहावर बैठक झाली. त्याला वरीष्ठ नेत्यांनी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकमताने निवडण्याचा प्रस्ताव समोर झाला. त्यासाठी गुरूवारी (ता.6) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजीत कदम, आमदार अमीत झनक आणि डॉ. सत्यजीत तांबे या नेत्यांची पुण्याच्या विश्रामगृहावर बैठक झाली. त्यात डॉ. तांबे यांना आमदार झनक आणि श्री. राऊत यांनी पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. त्यात युवक कॉंग्रसेचे मावळते प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतला. त्यातुन सर्वाधीक स्पर्धा होणाऱ्या युवक कॉंग्रसेच्या निवडणुकीत एकमत करण्याचा नवा पायंडा पडण्याची चिन्हे आहेत. मात्र, अध्यक्षांसह उर्वरीत पदांची निवडणूक मात्र ठरलेल्या कार्यक्रमानुसार होईल. 

दोन उपाध्यक्षपदाचा नवा फॉमुला
अध्यक्षपदासाठी डॉ. तांबे यांसह आमदार अमित झनक, कुनाल राऊत, समरहुर खान आणि नीशा नागझोरे असे पाच उमेदवार आहेत. यासंदर्भात झालेल्या चर्चेतुन अध्यक्षपदाचे उमेदवार आमदार झनक आणि राऊत यंदा उपाध्यक्षपदी नियुक्त करण्याचा फॉर्मुला पुढे आला आहे. यापूर्वी एक अध्यक्ष व एक उपाध्यक्षाची प्रथा होती. त्यात बदल करून दोन उपाध्यक्ष होतील. गेले महिनाभर यावर राजकारण तापले होते. राज्यात 2.55 लाख मतदार आहेत. उत्तर महाराष्ट्रात 60 हजार 700 सदस्य आहेत. यात सर्वाधिक नगरला 34 हजार 528 मतदार आहेत. 

मंगळवारपर्यंत निवडणूक कार्यक्रम
युवक कॉंग्रेसच्या राज्यपातळीसह जिल्हा, शहरपातळीवरील संघटनेची उद्यापासून तीन दिवस (ता. 9 ते 11) निवडणूक होत असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, महापालिका गटनेते शाहू खैरे, मध्य लोकसभा अध्यक्ष राहुल दिवे, मध्य नाशिक ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे, भरत टाकेकर, आर. आर. पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, शहराध्यक्ष व शहर सरचिटणीस या पदासाठीही निवडणूक होत आहे. शहरी भागातील पाच जागांसह तालुकाध्यक्ष पदासाठीच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. 

असे होणार मतदान 
- ता. 9 - सिन्नर, येवला व निफाड 
- ता. 10 - दिंडोरी, कळवण, सटाणा 
- ता. 11 - बागलाण, मालेगाव (शहर व ग्रामीण), नाशिक मध्य, पूर्व व पश्‍चिम, नाशिक रोड, देवळालीसह इगतपुरी 
- प्रत्येक केंद्रात पाचशे मतदानाची सोय असलेले ईव्हीएम मशिन 
- दिल्लीतील मतदान अधिकारी निवडणुकीनंतर आठ दिवसांत करणार निकाल जाहीर 
- मतदानाची वेळ सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत 
- प्रत्येक सदस्य देणार पाच मते 
- मतदानासाठी वेळ एक मिनीट दहा सेकंद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com