Satyajeet Tambe : काँग्रेसमध्ये राहण्याबाबत सत्यजीत स्पष्टचं बोलले; म्हणाले...

Nana Patole, Balasaheb Thorat and Satyajeet Tambe
Nana Patole, Balasaheb Thorat and Satyajeet Tambe

नाशिक - नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने मोठा वाद झाला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षातून सत्यजीत यांच्यासह त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना निलंबीत करण्यात आलं. आजअखेर सत्यजीत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Satyajeet Tambe news in Marathi)

Nana Patole, Balasaheb Thorat and Satyajeet Tambe
अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या IASचा आणखी एक कारनामा; उपमुख्यमंत्रीही संतापले, म्हणाले...

सत्यजीत तांबे म्हणाले की, मी सुरुवातीपासून पक्षाकडे पद किंवा काही तरी जबाबदारी मागितली. मात्र मला पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी सांगितलं की तुम्ही वडिलांच्या जागी प्रयत्न करा. त्यानंतर कार्यकर्त्यांचा रेटा पाहून वडिलांनीच माघार घ्यायचं ठरवलं. त्यानुसार मी अर्ज सादर भरण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडून दोन एबी फॉर्म चुकीचे पाठविण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला. तांबे यांनी यावेळी अनेक गौप्यस्फोट केले.

Nana Patole, Balasaheb Thorat and Satyajeet Tambe
Shiv Sena : माझ्या मतदारसंघातून लढून दाखवा; शिंदे गटातील बड्या नेत्याचं ठाकरेंना ओपन चॅलेंज

यावेळी सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच ही माझी शेवटची पत्रकार परिषद असल्याचं सांगत, मला माझ्या पक्षाला आणखी बदनाम करायचं नसल्याचं म्हटलं. अर्थात सत्यजीत तांबे हे अजुनही काँग्रेसमध्ये असल्याचं स्पष्ट सांगत आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागणार आहे.

दरम्यान निवडणुकीत आपल्याला सर्वच राजकीय पक्षांनी मदत केल्याचं ते म्हणाले. तसेच मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याच षडयंत्र रचल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र त्यांचा रोख कुणाकडे आहे, हे स्पष्ट केलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com