“माझा यशाचा एकच बाप आहे आणि तो…” सत्यजीत तांबेंचं वक्तव्य चर्चेत: Satyajeet Tambe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyajeet Tambe

Satyajeet Tambe : “माझा यशाचा एकच बाप आहे आणि तो…” सत्यजीत तांबेंचं वक्तव्य चर्चेत

काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, त्यांच एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. “माझा यशाचा एकच बाप आहे,” असं विधान तांबे यांनी केलं आहे. (Satyajeet Tambe Success Father sudhir tambe Nashik Graduate Constituency maharashtra politics)

एका कार्यक्रमात बोलताना सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीतील यशावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयात पदवीधर शिक्षकांची भेट घेतली.

Uddhav Thackeray: खेडमध्ये पोहचताच उद्धव ठाकरेंची नारळाने काढली दृष्ट

नेमकं काय म्हणाले सत्यजीत तांबे?

अनेक लोकं येतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली, आमच्यामुळे तुम्ही निवडून आला आहात. परंतु, माझ्या विजयाचं खरं श्रेय माझ्या वडिलांच्या कामाला आहे.हे मी सभागृहातही मांडलं.

इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स’. यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे,” असं मत सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं.

Sharad Pawar : ...तर मेघालयात आज राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता; तिघांनी केली होती NCPची स्थापना

तसेच, बापाच्या आणि मुलाच्या कामाची तुलना होण्याचा महाराष्ट्राला आणि भारताला फार मोठा इतिहास आहे,” असं सूचक वक्तव्यही सत्यजीत तांबेंनी केलं.

टॅग्स :Satyajeet Tambe