सत्यजित तांबे यांनी घेतली विखे पाटलांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | Satyajeet Tambe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyajeet Tambe

सत्यजित तांबेंनी घेतली विखे पाटलांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्याचे पाहिला मिळाले होते. काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिला होता.

मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि ते निवडून आले.

नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी विखे पाटलांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सत्यजित तांबेंनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांची भेट घेतली आहे.

त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर दिली जात आहे. तर दुसरीकडे विखे आणि थोरात यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

थोरात आणि विखे यांच्यातील वाद राज्याला माहित आहे मात्र बाळासाहेबांचे भाचे असलेल्या सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता.

त्यानंतर भाजपमध्ये यावे अशी थेट ऑफर देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांनी दिली होती. दरम्यान आता राजेंद्र विखे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

टॅग्स :CongressBjp