
Satyajit Tambe: 'उडत्या पाखरांना…', सत्यजीत तांबेंनी दाखवली पक्ष सोडण्याची तयारी?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीरसभेत अप्रत्यक्ष बंड केलेल्या सत्यजीत तांबे यांना स्वगृही येण्याचे आवाहन केले. मात्र, सत्यजीत तांबे यांनी सूचक ट्विट केले आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. असं सत्यजीत तांबे यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर तांबे यांनी पक्ष सोडण्याची तयारी दाखवली आहे. अशी उलटसुलट चर्चा रंगली आहे.
काल संगमनेर येथे बोलताना थोरात यांनी सत्यजीतची टीम काँग्रेसमध्ये राहिली आहे. पण तो एकटा राहिला आहे. आता तुलाही करमणार नाही. असं वक्तव्य केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात तांबे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं.
ShindeVsThackeray: सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने उघडला नवा पत्ता; सुनावणीला नवं वळण
दरम्यान, या चर्चेला पुर्णविराम देत तांबे यांनी सूचक ट्विट केले आहे. 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…नजरेत सदा नवी दिशा असावी । घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।' अशा आशयाचे ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.
तांबे यांच्या ट्विटनंतर राजकीय गोटात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. सत्यजीत तांबे यांनी पक्ष सोडण्याची तयारी दाखवली आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Balasaheb Thorat: बाळासाहेब म्हणाले, 'एकट्या भाच्याला करमणार नाही'; सत्यजीत तांबे स्वगृही परतणार?
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
राज्यात भारत जोडो यात्रा आलेली तेव्हा सत्यजीत तांबे यांनी खुप मेहनत घेतली. सत्यजीतची टीम काँग्रेसमध्ये राहिली आहे. पण तो एकटा राहिला आहे. आता तुलाही करमणार नाही, त्यांनाही करमणार नाही आणि काँग्रेसलाही करमणार नाही. असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सत्यजीत हे काँग्रेसमध्ये पुनरागमन करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.