व्हय, मी सावित्रीबाई बोलतेय...!

अमित गवळे
गुरुवार, 3 जानेवारी 2019

पाली - गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रायगड जिल्हा परिषदेच्या तळवली प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सोनल पाटील ‘व्हय मी सावित्रीबाई बोलतेय...!’ या एकपात्री प्रयोगाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यासाठी त्या कोणतेही शुल्क किंवा मानधन स्वीकारत नाहीत. सावित्रीबाईंचे बालपण ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण संघर्षमय जीवनपट त्या एकपात्री प्रयोगातून हुबेहूब चितारत. आतापर्यंत त्यांनी २८ प्रयोग केले आहेत. गुरुवारी (ता.३) सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त पालीतील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात त्यांचा २९ वा प्रयोग होणार आहे. 

पुण्यातील सुषमाताई देशपांडे यांच्या कार्यशाळेतून प्राथमिक शिक्षिका सोनल पाटील यांनी एकपात्री प्रयोगाचे धडे घेतले. सुषमा देशपांडे यांनीच या प्रयोगाची पटकथा लिहिली आहे. त्याचे पुस्तकदेखील आहे. माणगाव तालुक्‍यातील वडघर येथे असलेल्या साने गुरुजी स्मारकातील सभासदांनी पाटील यांना हे एकपात्री प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सोनल पाटील यांनी पहिला प्रयोग १० मार्च २०१६ ला राजिप तिसे शाळेत सादर केला. दुसरा प्रयोग १२ एप्रिलला इंदापूर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त महिला मेळाव्यात केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नगर, रत्नागिरी, चिपळूण आणि रायगड अशा विविध ठिकाणी एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण केले आहे. 

मोठ्यांसाठी असलेला प्रयोग सव्वा ते दीड तास चालतो; तर विद्यार्थ्यांसाठी असलेला प्रयोग पाऊण ते एक तास चालतो. सर्वसामान्यांसह अनेक दिग्गजांनी त्यांच्या या एकपात्री प्रयोगाचे आणि प्रबोधनकार्याचे कौतुक केले आहे. ‘व्हय मी सावित्रीबाई बोलतेय...!’ या नावाचे त्यांचे वेबपेजदेखील आहे.

सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधन यासाठी काम सांभाळून हे एकपात्री प्रयोग सादर करते. यासाठी कोणतेही मानधन किंवा शुल्क घेत नाही. या माध्यमातून सावित्रीबाईंचे विचार आणि आचार विद्यार्थी आणि जनमानसांत पोहचविण्याचे माझे ध्येय आहे.  
- सोनल पाटील, शिक्षिका, एकपात्री प्रयोग सादरकर्त्या

सोनल पाटील अतिशय अप्रतिम व प्रबोधनात्मक कलाकृती सादर करतात. सुस्पष्ट संवाद, डोळ्यात पाणी आणणारा अभिनय, न थकता सावित्रीबाईंमध्ये एकरूप होऊन त्‍या सादरीकरण करतात. 
- शाम धांडे, प्रेक्षक

Web Title: Savitribai Phule Birth Anniversary Education Sonal patil One Act Play