Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या कार्यालयात घोटाळा; दोघांविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp leader  Kirit Somaiya

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या कार्यालयात घोटाळा; दोघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईः घोटाळेबाजांच्या मागे लागून त्यांना नामोहरम करणारे भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयात घोटाळा झाला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

मुंबईतल्या मुलूंडमध्ये किरीट सोमय्या यांचं कार्यालय आहे. 'ऐका स्वाभिमानाने' या उपक्रमांतर्गत श्रवणयंत्र वाटप करण्यात येत होते. मात्र यातच दोघांनी गैरव्यवहार केल्याची माहिती आहे. जवळपास साडेसात लाख रुपयांच्या श्रवणयंत्रांचा परस्पर अपहार झाला असून कार्यालय प्रमुखांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. नवघर पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

कार्यालयप्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या तक्रारीवरुन नवघर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट ही किरीट सोमय्या यांची संस्था आहे. संस्थेमार्फत ५०० रुपयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र दिले जाते.

याच कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड आणि श्रीकांत रमेश गावित यांनी ७ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार केल्याची प्राथमिक माहिती आहे. नवघर पोलिसांमध्ये दोघांविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. किरीट सोमय्या यांच्याच कार्यालयात गैरव्यवहार झाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

टॅग्स :BjpKirit Somaiya