एसटीचा "अश्‍वमेध' याच आठवड्यात! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

मुंबई - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात स्कॅनिया कंपनीच्या 15 अश्वमेध बस नवीन रंगसंगतीसह आठवडाभरात दाखल होणार आहेत. 

प्रवाशांची पसंती मिळवलेल्या "शिवनेरी'च्या 15 वातानुकूलीत बसही एसटीच्या ताफ्यात येतील. "अश्वमेध' आणि "शिवनेरी' अशा 30 बस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. मुंबई-पुणे मार्गावर चालवण्यात येत असलेल्या एसटीच्या शिवनेरी बसला लग्नसराई आणि सुट्यांमुळे प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महामंडळाने आणखी 15 बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

अश्‍वमेध बसवर राजमाचीच्या रेखाचित्राच्या पाश्वभूमीवर सूर्योदयाच्या रंगछटा आहेत. त्याचबरोबर अश्वाचे चित्रही बसवर चितारले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-पुणे, ठाणे-पुणे, पुणे-नाशिक या मार्गांवर या बस धावतील. त्यांचे भाडे "शिवनेरी'प्रमाणे असेल. 

खासगी ट्रॅव्हल्सना टक्कर देण्यासाठी एसटीने अत्याधुनिक सुविधा असलेल्या 15 मल्टिअक्‍सेल बसेसही भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्या अन्य मार्गांवरही सुरू करण्याचा एसटी महामंडळाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Scania Company's 15 Ashwamed Bus

टॅग्स