विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई  - राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती शुक्रवारी शिक्षण विभागाने दिली. राज्यातील 75 हजार 718 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी शिक्षण विभागाने 254 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

उच्च तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यातील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 

या शिष्यवृत्तीसाठी 2016-17 करिता एक लाख 54 हजार 750 विद्यार्थ्यांसाठी 471.38 कोटी खर्च झाले. 2017-18 साठी एक लाख 58 हजार 379 विद्यार्थ्यांसाठी 38 लाखांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 75 लाख 718 विद्यार्थ्यांच्या खात्यांत 254 कोटी 99 लाखांची रक्कम जमा झाली. 

Web Title: Scholarship amount in the student account