शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्यांची संख्या यंदा लाखाने वाढली

Exam
Exam

पुणे - पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा एक लाखाने वाढली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून घेतली जाणारी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आतापर्यंत ९ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील २० हजार विद्यार्थ्यांचे शुल्क प्रलंबित आहे. अर्ज करण्यासाठी आणखी एक दिवसाचा अवधी आहे, त्यामुळे ही संख्या साडेनऊ लाखांहून अधिक होण्याची चिन्हे आहेत. गेल्यावर्षी परीक्षेसाठी आठ लाख ६० हजार विद्यार्थी बसले होते. यंदा शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.

पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळांमार्फत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. येणाऱ्या अर्जांची संख्या विचारात घेऊन पुन्हा १० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली.

विद्यार्थिसंख्या वाढविण्यासाठी महसूल विभागनिहाय व तालुकानिहाय कार्यशाळा घेण्यात आली. तसेच, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी शाळांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेने पाचवी व आठवी वर्गातील किमान ५० टक्‍के विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज आवश्‍यक असल्याचे सांगितले होते.
- स्मिता गौड, उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com