शिष्यवृत्तीसाठी यंदाही दमछाक 

शिष्यवृत्तीसाठी यंदाही दमछाक 

नाशिक - शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात झालेल्या गोंधळामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक संस्था "व्हेंटिलेटर'वर आल्या होत्या. या शैक्षणिक वर्षातही असाच गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. महाडीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच शिष्यवृत्तीची रक्‍कम देण्याच्या पद्धतीबाबतही शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे "पहिले पाढे पंचावन्न' ही म्हण या धोरणाबाबत खरी ठरणार असल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षी प्रारंभी ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविले होते. तांत्रिक अडचणीमुळे नंतर ऑफलाइन स्वरूपात शिष्यवृत्ती अर्ज मागविले गेले. मात्र शिष्यवृत्तीची रक्‍कम अदा करण्यासंदर्भात निर्माण झालेला मतभेद न्यायालयापर्यंत गेल्यानंतर सरकारने शैक्षणिक शुल्काची रक्‍कम महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांना देण्यास सहमती दर्शविली होती. या संपूर्ण प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना पैसे मिळण्यास विलंब तर झालाच, शिवाय संस्थांनाही प्राध्यापकांचा पगार करणे कठीण झाले होते. शैक्षणिक वर्ष 2018-19 चे पहिले सत्र संपले असताना, या वर्षीदेखील शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. 

सुट्यांमध्ये अर्ज भरणार कसे? 
शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत गुरुवारपर्यंत (ता. 15) दिलेली आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या सुरू असल्याने विद्यार्थी महाविद्यालयात उपलब्ध नसतात. सुट्यांमुळे विहीत मुदीत अर्ज सादर करणे अनेक विद्यार्थ्यांना शक्‍य नाही. अशा परीस्थितीत अर्ज सादर न झाल्यास असे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहाण्याची भीती व्यक्‍त होत आहे. 

...या आहेत प्रमुख अडचणी 
* बऱ्याच वेळा संकेतस्थळ बंद पडते 
* अर्ज भरताना उद्‌भवतात तांत्रिक अडचणी 
* नमुन्यांच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com