परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई - खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी राज्य सरकारकडून अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतच्या योजनेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू असलेल्या परदेशी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर खुल्या, तसेच अन्य मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे.योजनेअंतर्गत खुल्या व अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 

अन्य निर्णय
सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख मिशन
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजना गतिमान होणार
बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार
वृद्धांसाठी ‘रिजनल जिरॅएट्रिक सेंटर’ची नागपूर येथे स्थापना

Web Title: Scholarships for students for higher education abroad