भीक मागणाऱ्या मुलांसाठी 'सिग्नल शाळा' - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नागपूर - मुंबईत भीक मागणाऱ्या मुलांसाठी "सिग्नल शाळा' सुरू करण्याविषयी विचार सुरू आहे. ठाणे महापालिकेने राबवलेल्या अशा उपक्रमाची माहिती घेऊन मुंबईतही तो सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

मुंबईतील काही विकलांग भिकारी मुलांना पळवून जमीनदारांना विकले जात असल्याबाबतचा प्रश्‍न सदस्य अमित साटम यांनी विधानसभेत विचारला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. मुंबईतील काही विकलांग भिकारी मुलांना पळवून श्रीगोंदा येथील जमीनदारांना विकले जात असल्याबाबत लोणी व्यंकनाथ शिवारातील व शिरसगाव बोडखा (ता. श्रीगोंदा) येथील नऊ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या मुलांच्या शिक्षणाविषयी धोरण ठरवण्यासाठी सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन समिती नेमण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मुंबई शहरातील भिक्षेकरी गृहाचा भूखंड विकसकाला दिल्याबद्दल तसेच ठाणे महापालिकेने भीक मागणाऱ्या मुलांसाठी उड्डाण पुलाखाली "ट्रॅफिक सिग्नल'जवळ शाळा सुरू केली आहे. हा उपक्रम मुंबई शहरात राबवणार काय, असा प्रश्‍न ऍड. आशिष शेलार यांनी विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की ठाणे महापालिकेच्या उपक्रमाची माहिती घेऊन त्याबाबत विचार केला जाईल. या चर्चेत सदस्य योगेश सागर, मनीषा चौधरी आदींनी भाग घेतला.

Web Title: School children seeking alms signal