शाळा मूल्यांकनाचे गुरुवारपासून शिबिरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात नुकतीच सहविचार सभा झाली. त्यामध्ये राज्यातील मूल्यांकन झालेल्या शाळांच्या प्रस्तावातील त्रुटींच्या पूर्ततेसाठी गुरुवार (ता. 25) पासून विभागनिहाय शिबिरे होणार आहेत.

सोलापूर - पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात नुकतीच सहविचार सभा झाली. त्यामध्ये राज्यातील मूल्यांकन झालेल्या शाळांच्या प्रस्तावातील त्रुटींच्या पूर्ततेसाठी गुरुवार (ता. 25) पासून विभागनिहाय शिबिरे होणार आहेत.

पुण्यातील सभेस आमदार दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे यांच्यासह शिक्षण संचालक दिनकर पाटील, शिक्षण सहसंचालक राजेंद्र गोधणे व राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक उपस्थित होते.

राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या मूल्यांकन झालेल्या शाळा, वर्ग, तुकड्यांच्या त्रुटी पूर्ततेसाठी विभागनिहाय शिबिरे घेण्याचे ठरले.

शिबिराचे विभागनिहाय वेळापत्रक
25 जुलै - अमरावती व नागपूर विभाग
26 जुलै - कोकण व मुंबई विभाग
27 जुलै - पुणे व कोल्हापूर विभाग
28 जुलै - नाशिक व औरंगाबाद विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Evaluation camps from Thursday