मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व तुळजापुरातून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

तुळजापूर - मूक मोर्चाची भाषा सरकारला कळत नाही. त्यामुळे ठोक मोर्चे काढल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. आता मंत्रालयात घुसून आरक्षण मिळवू, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अडवून दाखवावे, असा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाचे येथे शुक्रवारी (ता. २९) रणशिंग फुंकल्याचे समन्वयकांनी जाहीर केले.

तुळजाभवानीमातेच्या दरबारात सरकारच्या धोरणांचा निषेध करीत ‘जागरण गोंधळ’ घातल्यानंतर घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. येत्या आठ दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरवून आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. 

मराठा समाजाला आरक्षणासह अन्य काही मागण्यांसाठी यापूर्वी राज्यभरात तब्बल ५८ क्रांती मूक मोर्चे निघाले. प्रत्येक ठिकाणी ऐतिहासिक ठरलेल्या या मोर्चांद्वारे लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. त्यानंतर शासनाने मराठा समाजासाठी विविध घोषणा केल्या, काही आश्‍वासने दिली. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आता मूक नव्हे तर ठोक मोर्चे काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला. त्याची सुरवात येथे जागरण गोंधळ घालून करण्याचे ठरले होते. त्यानुसार सकाळी अकराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. विविध जिल्ह्यांतील समन्वयक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. 

भवानी रस्त्याने मोर्चा तुळजाभवानीमाता मंदिराच्या महाद्वारासमोर आला. तेथे शासनाच्या धोरणांचा निषेध करीत जागरण गोंधळ घालण्यात आला. 

आता शांत बसणार नाही
जागरण गोंधळानंतर समन्वयकांनी भूमिका मांडली. मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे जाहीर केले. मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाऐवजी  आक्रमकतेने उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्तेतील नेते मराठ्यांचा केवळ वापर करीत आहेत. यापुढे शासनासोबत कसलीच चर्चा होणार नाही. आरक्षण कसे जाहीर करायचे ते आम्ही सरकारला शिकवू. शेतमालाला भाव नाही, समाजातील मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्‍वासन हवेतच विरले आहे. आता शांत बसणार नाही, असा इशारा समन्वयकांनी दिला.

Web Title: Second phase of Maratha Kranti Morcha from Tuljapur