...म्हणूनच खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

शिवसेनेचे खासदार व आत्ता शिवसेनेची तलवार असणारे संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राऊत हे मिडीयामध्ये कायमच चर्चेत होते. आज त्यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे.  

मुंबई :शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेत केलेल्या भाषणानंतर त्यांचे पाकिस्तानात पोस्टर लागले होते.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार भाषण करत खंबीर पाठिंबा दिला होता. कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत होतो. तो डाग आज धुवून टाकला गेला, असं जोरदार भाषण करत संजय राऊत यांनी अमित शाहांना पाठिंबा दिला. संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान अमित शाहांनी त्यांना पाठिंबा देत अभिमानाने बाकही वाजवला होता.

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

त्या भाषणाचे पडसाद फक्त संसदेच्या सभागृहात किंवा देशातच नाही, तर पाकिस्तानातही उमटले होते. चवताळलेल्या पाकिस्तानात संजय राऊत यांचे  होर्डिंग्ज ठिकठिकाणी लावण्यात आलं होतं. गृह विभागाच्या अहवालानुसार संजय राऊत यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राऊत हे मिडीयामध्ये कायमच चर्चेत होते. आज त्यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security increased by MP Sanjay Raut