अरे बापरे! पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती आहे पहा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार ७०१ इतकी झाली आहे. त्यापैकी ४१ हजार ५४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, हे प्रमाण ५८.७६ टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण २.८७ टक्के इतके आहे.

पुणे - पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार ७०१ इतकी झाली आहे. त्यापैकी ४१ हजार ५४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, हे प्रमाण ५८.७६ टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण २.८७ टक्के इतके आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागात सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २७ हजार १३० इतकी आहे. विभागात कोरोनाबाधित दोन हजार ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ८२४  रुग्ण गंभीर असल्याची माहिती विभागीय 
आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Image may contain: one or more people

अनलॉकची नियमावली आज जाहीर होणार; पुणेकरांची उत्सुकता शिगेला!

पुणे जिल्ह्यात बुधवारी दुपारपर्यंत बाधित रुग्ण संख्या ५८ हजार २७ इतकी झाली. त्यापैकी ३६ हजार २७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २० हजार ५४५ आहे. 

यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात १४ हजार ४७८, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात ३ हजार ८१३, पुणे कँटोन्मेंट २५७, खडकी विभागात ४७, ग्रामीण भागात १ हजार ५८१, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील १०० रुग्णांचा 
समावेश आहे.

लोणी काळभोरमध्ये आढळले आणखी 31 कोरोनाग्रस्त रुग्ण; रुग्णसंख्या पोहोचली...

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एक हजार ४५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात १ हजार ६१, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात २३६, पुणे कँटोन्मेंट २९, खडकी विभागातील २७, ग्रामीण क्षेत्रातील ६८, जिल्हा शल्य चिकित्सक ३४ यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ६२.०९ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.५१ टक्के इतके आहे.

देशातील दीड हजार लोकांना कोरोना लस देणार 

आजअखेर सुमारे साडेतीन लाख चाचण्या
पुणे विभागात आजअखेर एकूण ३ लाख ४९ हजार १७२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ लाख ४५ हजार २९५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे, तर ३ हजार ८७७ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी २ लाख ७३ हजार ८४४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See the number of coronavirus patients in five districts of Pune division