ग्राहकांना सवलत देण्यासाठी केंद्राला मागणार निधी; कोण म्हणाले ते वाचा 

संतोष सिरसट 
सोमवार, 29 जून 2020

सोलापूर ः लॉकडाउनच्या काळात महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली. या काळातील वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी केंद्राकडे निधीची मागणी केली जाणार आहे. याबाबत राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत केंद्राला पत्र लिहिणार आहेत. 

मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न महावितरण करत आहे. घरगुती वीज ग्राहकांचे विद्युत शुल्क, वीज बिलाचे हप्ते तथा कालावधी, एकरकमी विजेच्या बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना सवलत, वीज बिल हप्त्यावरील व्याज तसेच इतर राज्याने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून महावितरणने स्वयंपूर्ण प्रस्ताव दोन दिवसात देण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

लॉकडाउनमुळे ग्राहकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना अतिरिक्त भुर्दंड पडू नये तसेच त्यांना वीज बिल भरण्यासाठी जास्तीत जास्त सवलत कशा पद्धतीने देता येइल, यादृष्टीने महावितरणने पाउले उचलावीत. सोबतच, बिलाबाबत ग्राहकांचे समाधान होण्यासाठी ग्राहकांशी प्रत्यक्ष अधिकाधिक संवाद वाढवावा. वीज बिल सोप्या भाषेत समजावून सांगावे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभावी वापर आणि जनमताच्या कौलाचा आदर देखील केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

नुकत्याच झालेल्या कॉन्फरन्सद्वारे त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक दिनेशचंद्र साबू, सतीश चव्हाण, प्रभारी संचालक स्वाती व्यवहारे, कार्यकारी संचालक योगेश गडकरी, अनिल नगरारे, अनिल खापर्डे, सुहास रंगारी, दिलीप दोडके, शरद दाहेदार, नारायण आमझरे उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To seek funds from the Center to provide discounts to consumers; Read who said that