Aaditya Thackeray : महाराष्ट्रातला पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प हलवला गुजरातमध्ये; ट्विटमुळे चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray : महाराष्ट्रातला पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प हलवला गुजरातमध्ये; ट्विटमुळे चर्चा

Aaditya Thackeray : महाराष्ट्रातला पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प हलवला गुजरातमध्ये; ट्विटमुळे चर्चा

महाराष्ट्रातील चांगले उद्योग गुजरातला हलवले जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला जातो. त्यातच आता महाराष्ट्रातील सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा झाली. या बाबतचे स्क्रीनशॉट शेअर करत माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

माविआ सरकारच्या काळात बनत असलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये हलवला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. वेदांता-फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. याचा ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प अहमदाबादजवळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली.

माविआ सरकारच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठका घेतल्या. महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्याबाबत सर्वकाही प्रयत्न करण्यात आले होते. हा प्रकल्प राज्यात आला असता तर नवीन सरकारला याचे श्रेय घेता आले नसते. या नव्या सरकारकडे आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची वचनबद्धता दिसत नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.

प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूला सेमीकंडक्टर (चीप)ची गरज असते. या चीपनिर्मितीत जगात तैवान आघाडीवर आहे. भारतात चीप निर्मितीचा एकही प्रकल्प नाही. त्यासाठी भारतात काम सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी वेदांत लिमिटेडकडून हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धेत होती.

Web Title: Semiconductor Project Seen In Maharashtra Shifted To Gujarat Discussion Due To Aditya Thackerays Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..