राज्यसभेत 'नागरिकत्त्व' विधेयक मंजूर अन् मुंबईत आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा

टीम ई-सकाळ
बुधवार, 11 डिसेंबर 2019

- नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक आज (बुधवार) राज्यसभेत मांडण्यात आले. हे विधेयक मंजूरही झाले.

मुंबई : नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक आज (बुधवार) राज्यसभेत मांडण्यात आले. हे विधेयक मंजूरही झाले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी आपल्य पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. त्यानंतर आता याबाबत अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्यातच आता वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. 

राजीनाम्याचे कारणही त्यांनी सांगितले असून, नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकास विरोध दर्शवत या पदाचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले.

Image may contain: text

राजीनाम्याचे पत्रक व्हायरल

अब्दुल रेहमान यांनी नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकास विरोध दर्शविला. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचे पत्रक सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

No photo description available.

#CAB : नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेतही मंजूर

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior IPS officer Abdur Rahman quit service in civil disobedience over Citizenship Amendment Bill