ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तळवलकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी. डी. गोएंका. दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

पुणे - ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर (वय 92) यांचे आज (बुधवार) अमेरिकेत वृध्दापकाळाने निधन झाले.

मराठीसह इंग्रजी भाषेतील स्तंभलेख आणि अग्रलेखांसाठी गोविंद तळवलकर यांचे नाव प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे. तळवळकर यांनी 'नवभारत'मधून पत्रकारिता क्षेत्रातील कारकीर्दीची सुरूवात केली. लोकसत्ता वृत्तपत्रात त्यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले, तर महाराष्ट्र टाईम्सचे ते २८ वर्ष संपादक होते. याशिवाय अनेक इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी स्तंभलेखन केले.

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तळवलकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी. डी. गोएंका. दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
 
Web Title: Senior journalist and eminent writer Govind Talwalkar passed away