ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची फसवणूक

Senior Litterateur Nagnath Kottapalle being financially cheated
Senior Litterateur Nagnath Kottapalle being financially cheated

पिंपरी, (पुणे) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची एक लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर परिसरात घडली. 

नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय 70, रा. कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रेणुका आचार्य, प्रशांत दीक्षित (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून आरोपी रेणुका आणि प्रशांत या दोघांनी कोत्तापल्ले यांच्याशी मोबाईलफोन आणि मेलद्वारे वेळोवेळी संपर्क केला. कोत्तापल्ले यांची एचडीएफसी बँकेत कोणत्याही प्रकारची पॉलिसी नसताना आरोपींनी पॉलिसीचे पैसे जास्त मिळतील असे आमिष दाखवले. आरोपींनी कोत्तापल्ले यांना एक लाख रुपये खात्यावर भरण्यास प्रवृत्त केले. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही.

तसेच गुंतवणूक केलेले पैसे परत दिले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोत्तापल्ले यांनी तत्काळ सांगवी पोलिसात धाव घेतली. सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com