राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Police
Police

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील तीन अतिरिक्त महासंचालक आणि मुंबई पोलिस दलातील चार अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने मंगळवारी बदल्यांचे आदेश जारी केले.

अतिरिक्त पोलिस महासंचालक (नियोजन व समन्वय) धनंजय कमलाकर यांची धोरण विभागात नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागी एस. जगन्नाथन यांना पाठवण्यात आले आहे. राजेंद्र सिंह यांच्याकडे राज्याच्या विशेष कृती दलाच्या अतिरिक्त महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांची वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. निशित मिश्रा दक्षिण प्रादेशिक विभागाचा कार्यभार सांभाळणार आहेत. वाहतूक विभागाचे वीरेश प्रभू यांच्याकडे मध्य प्रादेशिक विभागाच्या अपर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदावर असलेले रवींद्र शिसवे यांच्याकडे संरक्षण व सुरक्षा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या बदलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या बदलीवरून अनेकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानंतरही भारती यांची बदली का करण्यात आली नाही, असा प्रश्‍न आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी उपस्थित केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com