कोविशील्ड लसीबाबत सीरमचा केंद्राला अर्ज; म्हणाले, आता...

सीरमने आतपर्यंत भारतात 1.25 बिलियनपेक्षा अधिक लसींचा पुरवठा केला आहे.
serum CEO adar poonawalla
serum CEO adar poonawalla

पुणे : पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) CDSO, DCGI आणि आरोग्य मंत्रालयाकडे संपूर्ण मार्केट ऑथरायझेशन देण्याची मागणी केली आहे. भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूवरील (Corona Virus) कोविशील्ड (Covishield Vaccine) लसींचा सीरम इन्स्टिट्यूटने 1.25 बिलियनपेक्षा अधिक लसींचा पुरवठा केला आहे. त्यामुळे भारत सरकारकडे संपूर्ण मार्केट ऑथराइजेशनसाठी पुरेसा डेटा उपलब्ध असल्याचे सीरमने म्हटले आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला (Adar Punawala) यांनी ट्वीट केले आहे. (Serum Institute so far supplied More Than 1.25 billion vaccines In India.)

कोरोना महामारीनंतर बाजारात आलेल्या लसीकरणात सीरमने महत्त्वाची भूमीका निभावली आहे. (Serum Played Key Role In Corona Epidemic) भारतासह अनेक देशांमध्ये या लसीचे डोस नागरिकांना देण्यात येत आहे. भारतात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसींचाच अधिक वापर करण्यात आला आहे. दरम्यान, सीरमने आतापर्यंत भारतात कोविशील्ड लसींचा 1.25 बिलियनपेक्षा अधिक पुरवठा केला आहे. त्यामुळे आता भारत सरकारकडे संपूर्ण मार्केट ऑथराइजेशनसाठी पुरेसा डेटा उपलब्ध आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटने CDSO, DCGI आणि आरोग्य मंत्रालयाकडे फुल मार्केट ऑथराइजेशनसाठी अर्ज केला आहे. (Serum Institute Applied To CDSO, DCGI & Ministry of Health For Full Market Authorization)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com