esakal | भाजपच्या 7 आमदारांचा अजित पवारांशी संपर्क; राजीनाम्याचीही तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

भाजपचे सात आमदारांचा अजित पवार यांच्याशी संपर्क झाला असून, मदत पडल्यास भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारीही या आमदारांनी दर्शविली असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. 

भाजपच्या 7 आमदारांचा अजित पवारांशी संपर्क; राजीनाम्याचीही तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नसताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपमधील सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपचे सात आमदारांचा अजित पवार यांच्याशी संपर्क झाला असून, मदत पडल्यास भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारीही या आमदारांनी दर्शविली असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. 

नकटं असावं पण, धाकटं असू नये; शिवसेनेला आला प्रत्यय 

दरम्यान, आज (सोमवार) सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय होणार हे स्पष्ट आहे. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी शिवसेनेला आज सायंकाळी साडेसातपर्यंत सत्ता स्थापनेसाठी मुदत दिली आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी शिवसेना आमदारांची मातोश्री येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्धव आणि आदित्य शरद पवारांच्या भेटीला रवाना झाले आहेत. या दोघांमध्ये कोठे बैठक होणार हे अद्याप निश्चित नाही. पण, या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार असून, त्यानंतर राजकीय परिस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वीच भाजप आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे.

सर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा : मुनगंटीवार

loading image