Farmer Suicide : राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer suicide

Farmer Suicide : राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आले. ३० जूनला शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी यापुढे राज्यात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही, अशी ग्वाही दिली. पण, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत दररोज सरासरी ७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याची वस्तुस्थिती आहे.

दरवर्षी राज्यात विशेषत: अमरावती, औरंगाबाद व नागपूर या विभागांत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती असतानाही त्यावर काहीच ठोस उपाय निघालेले नाहीत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत यंदा बीडमध्ये १५, अमरावती जिल्ह्यात १७५, यवतमाळ जिल्ह्यात १४३, बुलडाणा १५६, जळगाव ११५, औरंगाबाद ९२ आणि वर्धा जिल्ह्यात १०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर तर कधी दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार मात्र वाढत आहे. उत्पन्नावर परतफेड करण्याच्या हिशोबातून घेतलेले खासगी सावकाराचे देणे पण तसेच राहिले. दुसरीकडे घरात वयात आलेली मुलगी आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या मुलाची चिंता, यातून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

शेतकरी आत्महत्या न झालेले जिल्हे

कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यासह पुणे, सातारा व गडचिरोली या ८ जिल्ह्यांमध्ये मागील साडेआठ महिन्यांत एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. कोकण विभागात मागील तीन वर्षांत एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. पुणे विभागात पण आत्महत्या कमी झाल्या आहेत.

Web Title: Seven Farmers Commit Suicide Every Day In Maharashtra Heavy Rains Flood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..