विधानसभेत पाच वर्षांत कामकाजाचे तास सात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

मुंबई  - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जून ते २ जुलै असे १५ दिवस पार पडले. राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सध्याच्या सत्ताधारी भाजप सरकारच्या कार्यकाळातील हे अखेरचे अधिवेशन होते. तेराव्या विधानसभेची स्थापना २१ ऑक्‍टोबर २०१४ रोजी झाली. सभागृहाची पहिली बैठक ८ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आली. त्या दिवसापासून आजपर्यंत एकूण १८ अधिवेशने झालेली असून, सभागृहाच्या एकूण २२१ बैठका झाल्या. गेल्या पाच वर्षांत सभागृहाचे प्रत्यक्षात रोज सरासरी सात तास कामकाज झाले, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. 

सत्र काळातील काम  - १२ 
एकूण बैठकांची संख्या  - १०० तास १६ मिनिटे 
प्रत्यक्षात झालेले कामकाज  - ३ तास ३७ मिनिटे 
मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे वाया गेलेला वेळ  - ३ तास ३७ मिनिटे 
अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ  - ८ तास २० मिनिटे 

रोजचे सरासरी कामकाज 
तारांकित प्रश्‍न  - ८०२४ 
एकूण प्रश्‍न  - ७११ 
स्वीकृत प्रश्‍न - ५३ 
सभागृहात तोंडी विचारलेले प्रश्‍न  - ४ 

अल्प सूचना प्रश्न 
लक्षवेधी सूचना  - १८९० 
प्राप्त सूचना  - ८० 
मान्य झालेल्या सूचना  - ४३ 

चर्चा झालेल्या सूचना 
विशेष उल्लेख  - २५६ 
प्राप्त सूचना  - १३८ 

मांडलेल्या व पटलावर ठेवण्यात आलेल्या सूचना 
अर्धा तास चर्चा - १७३ 
प्राप्त सूचना  - ६८ 

स्वीकृत सूचना 
सभागृहात सदस्यांची उपस्थिती (टक्‍क्‍यांमध्ये) 
 ७८.६४  सरासरी   
८८.९३  जास्तीत जास्त 
४१.९७  कमीत कमी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven working hours in five years In the Legislative Assembly