सातवा वेतन आयोग एक जानेवारीपासून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यातील शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीचा अहवाल पाच डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे. मात्र हा अहवाल कसाही आला, तरी एक जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सदस्य कपिल पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सातवा आयोग कधी लागू करणार, पाच दिवसांचा आठवडा करणार का, कंत्राटी कामगारांना किमान 21 हजारांचे वेतन मिळावे, आदी प्रश्न सदस्यांनी विचारले. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना केसरकर म्हणाले, की बक्षी समितीचा अहवाल पाच डिसेंबर अपेक्षित आहे. हा अहवाल सकारात्मक येण्याची शक्‍यता आहे. मात्र अहवाल काहीही आला तरी एक जानेवारीपासून सातवा आयोग लागू करण्यात येईल. सातवा आयोग लागू केल्यानंतर आपसूकच कंत्राटी कामगारांचे किमान वेतन 21 हजारांपर्यंत जाणार असल्याचे केसरकर म्हणाले. 

Web Title: seventh pay commission will be held from January 1