गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणातील संशयित डॉ. शिंदेचा तुरुंगात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नाशिक - बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणातील तुरुंगात असलेला संशयित आरोपी डॉ. बळिराम निंबा शिंदेचा आज (शुक्रवार) तुरुंगात मृत्यू झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिंदे हॉस्पिटल येथे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी केल्याची बाब महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना लक्षात आल्याने डॉ. बळिराम निंबा शिंदे याला अलिकडेच ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी शिंदेचा तुरुंगात मृत्यू झाला. मृत्युचे कारण अद्याप समजले नसून तपास सुरू आहे. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील व्होकार्ट हॉस्पिटलसमोर डॉ. बळिराम निंबा शिंदे यांचे शिंदे हॉस्पिटल अँड मॅटर्निटी रिसर्च सेंटर होते. या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररीत्या गंर्भलिंग निदान चाचणी करून रुग्णाला पुरुष व स्त्री अर्भकाची माहिती दिली जात असल्याची कुणकुण महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत शिंदे यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर न्यायालयाने शिंदेला पोलिस कोठडी सुनावली होती. शिंदेवर यापूर्वीही मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. शिंदेला ताब्यात घेतल्यानंतर परळीच्या बहुचर्चित गर्भपाताच्या घटनेच्या आठवणी यामुळे ताज्या झाल्या होत्या.

Web Title: Sex determination test issue - Accused Dr. Shinde's death in jail