आबा पवार, कांबळेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल 

आबा पवार, कांबळेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल 

कुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत कांबळे या दोघांविरुद्ध शुक्रवारी पोलिसांनी इस्लामपूर येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 321 पानी व 97 साक्षीदार तपासणी केलेले हे दोषारोपपत्र आहे. बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत 27 सप्टेंबरला पवार आणि कांबळेविरोधात कुरळप पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. 

पीडित मुलींच्या अत्याचाराबाबत निनावी पत्र कुरळप पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना आले होते. त्यानंतर पवारच्या मुसक्‍या आवळल्या गेल्या. पवारसह त्याच्या साथीदारांच्या हातात बेड्या पडतील असे चित्र होते; मात्र वेळ निघून जाऊ लागल्याने पोलिसांबाबत संशय निर्माण झाला. आठ दिवसांपूर्वी पुण्यात आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या बैठकीत तपास अधिकारी किशोर काळे यांनी पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करू, असे सांगितले होते. मात्र आठ दिवसांतच दोषारोपपत्र दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पवारच्या अत्याचाराचा पाढा पाहता पीडित मुलींची संख्या सुमारे पन्नासच्या वर असल्याचे अनेक अहवालावरून दिसून येते. त्यामुळे बोगस भेटी देऊन सरकारच्या पैशावर ताव मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाबाबतही शंका उपस्थित होत आहे. 

या गुन्ह्याबाबत आणखी कोणास माहिती द्यायची असेल तर त्यांनी spdo.islampur.gov.in या संकेतस्थळावर किंवा 9822133679 या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. 
- किशोर काळे,  उपविभागीय पोलिस अधिकारी, इस्लामपूर 

पोलिसांच्या या कामाचे मी स्वागतच करते. न्यायालयावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. सरकारी वकील व पोलिस या प्रकरणातील इतर आरोपींवर कारवाई करण्यासाठी न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करतील. 
- आमदार डॉ. नीलम गोऱ्हे,  शिवसेनेच्या प्रवक्‍त्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com