Shahrukh-Salman:वर्षा बंगल्यावर करण- अर्जुन! शाहरुख सलमानने घेतलं एकनाथ शिंदेंच्या गणरायाचे दर्शन|Shahrukh Khan meets CM Eknath Shinde At His residence on the Occassion of Ganesh Chaturthi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan meets CM Eknath Shinde At His residence on the Occassion of Ganesh Chaturthi

Shahrukh-Salman:वर्षा बंगल्यावर करण- अर्जुन! शाहरुख सलमानने घेतलं एकनाथ शिंदेंच्या गणरायाचे दर्शन

Shahrukh-Salman meets CM Eknath Shinde:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवुडचा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचं शाहरुख खानने दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शाहरुख खानचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण -डोंबिवली मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी शाहरुख खानला श्रीगणेशाची मुर्ती भेट स्वरुपात दिली. यावेळी शिंद कुटुंब आणि शाहरुख खांनी यांनी फोटोही काढले. शाहरुख खान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवुडचा किंग खान सहसा कोणाच्याही घरी जात नाही. तो आधीपासून राजकारणापासून लांबच राहिला आहे. मात्र, बऱ्याच काळानंतर शाहरुख खान कोणत्या तरी राजकीय नेत्याच्या घरी गेल्याचं बघायला मिळालं. शाहरुख खान राजकीय नेतेचं नाहीतर फिल्म इंडस्ट्रीतील सहकलाकारांच्या घरी देखील जाताना दिसत नाही.

शाहरुख खान जेव्हा एकनाथ शिंदेंच्या घरी आला तेव्हा, तेव्हा शिंदे कुटुंबियांनी त्याचं आनंदाने स्वागत केलं. यावेळी शाहरुखशी सर्वांनी आपुलकीने संवाद साधला. (Latest Marathi News)

शाहरुख खान बरोबरच सलमान हा देखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या घरी गणरायाच्या घरी दर्शनाला एकत्र आले. ही करण-अर्जुनची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आलय.

सलमान खानसोबत यावेळी त्याची बहिण अर्पिता देखील होती. काही दिवसांपुर्वी सलमानची बहिण अर्पिताच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांच दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं होतं.

शाहरुख खान याचा नुकताच 'जवान' हा सिनेमा जगभर रिलिज झाला. त्याच्या या चित्रपटाने सर्वांना भुरळ घातली आहे. चित्रपटातील त्याचे लुक्स, वेशभुषा आणि अ‍ॅक्शन सिन्सची सर्वांकडून प्रशंसा केली जात आहे. या चित्रपटातून त्याने भारताच्या मतदारांना संदेशही दिला होता.

'जवान' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकलय. या चित्रपटाने कमाईमध्ये १००० कोटींचा टप्पा पार केला. (Latest Marathi News)

टॅग्स :political