खुल्या गटातील मागासांनाही योजना लागू

दीपा कदम  
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे.

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे.

शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने वाटेकरी आणल्याने मराठा समाजामधून  तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले, की राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही केवळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले असताना मराठा विद्यार्थ्यांसाठी झगडून मिळवलेल्या शिक्षणाच्या सवलतीवरही अशा पद्धतीने घाला घालणे हा विश्‍वासघात आहे. 

क्रांती मोर्चानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासाठी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. मात्र आता खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागासांनाही ही योजना लागू होणार असल्याने या योजनेचे लाभार्थी वाढणार आहेत. 

ही योजना असल्याने मराठा समाजाबरोबरच खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकांनाही लागू केली जात असल्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केले होते. ही योजना लागू होऊन अद्याप सहा महिने देखील झाले नसताना या योजनेला फाटे फोडण्यात येत असल्याने मराठा क्रांती मोर्चाने नाराजी व्यक्‍त केली. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahu Maharaj Scholarship Applicable to backward groups also