पुणे जिल्ह्यातील तेरा गावांना शरद आदर्श कृषी ग्राम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - जिल्ह्यातील तेरा गावांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा शरद आदर्श कृषी ग्राम तर, दौंड तालुक्‍यातील खोर येथील शेतकरी समीर डोंबे यांना जिल्हास्तरीय कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय पंधरा शेतकऱ्यांची तालुकास्तरीय कृषिनिष्ठ शेतकरी आणि तेरा दूध उत्पादकांची आदर्श गोपालक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ६) पुण्यातील अल्पबचत भवन येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

पुणे - जिल्ह्यातील तेरा गावांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा शरद आदर्श कृषी ग्राम तर, दौंड तालुक्‍यातील खोर येथील शेतकरी समीर डोंबे यांना जिल्हास्तरीय कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय पंधरा शेतकऱ्यांची तालुकास्तरीय कृषिनिष्ठ शेतकरी आणि तेरा दूध उत्पादकांची आदर्श गोपालक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ६) पुण्यातील अल्पबचत भवन येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत सन २०१७- १८ या वर्षासाठीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या पुरस्कारांची घोषणा केली.  या वेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे उपस्थित होते.

प्रत्येकी रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे कृषी ग्राम पुरस्काराचे, तर रोख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे जिल्हास्तरीय कृषिनिष्ठ आणि प्रत्येकी रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे तालुकास्तरीय कृषिनिष्ठ पुरस्काराचे स्वरूप आहे. आदर्श गोपालक पुरस्काराचे स्वरूप रोख प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. कृषिनिष्ठ शेतकरी आणि गोपालक पुरस्कार विजेत्यांचा सपत्नीक गौरव केला जाणार आहे. याच कार्यक्रमात ॲग्री ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सुजाता पवार यांनी सांगितले.  

पुरस्कार विजेत्यांची नावे - 
शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार - काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव), भोंडवेवाडी (ता. बारामती), पिसावरे (ता. भोर), नंदादेवी (ता. दौंड), पिंपरी सांडस (ता. हवेली), थोरातवाडी (ता. इंदापूर), निमगावसावा (ता. जुन्नर), गारगोटवाडी (ता. खेड), कशाळ (ता. मावळ), बेलसर (ता. पुरंदर), नेरे (ता. मुळशी), कुरूळी (ता. शिरूर). अंत्रोली (ता. वेल्हे). 

जिल्हास्तरीय कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार - समीर डोंबे (खोर, ता. दौंड).

तालुकास्तरीय कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार - (सर्वसाधारण विभाग) - बाळू नामदेव चासकर (कुडेवाडी, ता. आंबेगाव), अजित रघुनाथ गायकवाड (थोपटेवाडी, ता. बारामती), ज्ञानेश्‍वर बाजीराव बांदल (रावडी, ता. भोर), सुभाष बारीकराव कोतवाल (अष्टापूर, ता. हवेली), दत्तात्रय रामचंद्र मळेकर (तावशी, ता. इंदापूर), राजेंद्र लक्ष्मण शिंदे (निरगुडे, ता. जुन्नर), शंकर पांडुरंग टोके (पाडळी, ता. खेड), नितीन चंद्रकांत गायकवाड (चांदखेड, ता. मावळ), सुनील चंदरराव मारणे (कोंढावळे, ता. मुळशी), ज्ञानोबा निवृत्ती बधे (राजेवाडी, ता. पुरंदर), मंगल सुहास कोंडे (गणेगाव दुमाला, ता. शिरूर), दत्तात्रय यशवंत राऊत (अंत्रोली, ता. वेल्हे). 

आदिवासी गट : बाळू शंकर बेंढारी (पोखरी. ता. आंबेगाव), सखाराम बाळू वनघरे (भिवेगाव, ता. खेड), दाजी सखाराम कारभळ (तळेरान, ता. जुन्नर).

आदर्श गोपालक पुरस्कार : बाबाजी देवराम बांगर (बांगरवाडी, ता. जुन्नर), दत्तात्रय काशिनाथ वरपे (कळंब, ता. आंबेगाव), विलास किसन दरेकर (पाईट, ता. खेड), रामदास बाबुराव महाडिक (शिंदवणे, ता. हवेली), रामभाऊ बारकू नढे (कोथुर्णे, ता. मावळ), शांताराम देवराम रानवडे (नांदे, ता. मुळशी), बबन सखाराम ठाकर (अंत्रोली, ता. वेल्हे), सुजाता मिलिंद शिवतरे (उत्रोली, ता. भोर), तात्याबा बाबा बुरुंगले (वीर, ता. पुरंदर), संभाजी सुदाम गायकवाड (मगरवाडी, ता. बारामती), इलाही बाबू सय्यद (लुमेवाडी, ता. इंदापूर), श्रीधर संजय येळकर (बोरी भडक, ता. दौंड), केरू विठोबा मासळकर (जातेगाव, ता. शिरूर). 

गेल्या वर्षी एकाचवेळी सलग तीन वर्षांचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. परंतु यापुढे शेतकऱ्यांचा दरवर्षी या पुरस्कारांनी सन्मान केला जावा, अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार चालू वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
- सुजाता पवार,  कृषी व पशुसंवर्धन सभापती,  जिल्हा परिषद, पुणे. 

Web Title: Sharad aadarsh Krushi Gram to 13 villages in Pune district