...म्हणून शरद पवार संतापले!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

आपल्या नावे शेतकऱ्यांची थट्टा करणारे बनावट मेसेज समाज माध्यमातून प्रसारित होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. शरद पवार यांच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा करणारे मॅसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर शरद पवार यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

मुंबई - आपल्या नावे शेतकऱ्यांची थट्टा करणारे बनावट मेसेज समाज माध्यमातून प्रसारित होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. शरद पवार यांच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा करणारे मॅसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर शरद पवार यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

शरद पवार यांनी या संदर्भात ट्विट केले. तसेच संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांचा मोबाइल माझ्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, अशी अफवा व्हॉट्सअॅप या समाज माध्यमावरून पसरत असल्याचे मला समजले. काही समाजकंटकांनी पीडित शेतकऱ्यांची केलेली ही क्रूर चेष्टा आहे.
 

अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करून मी असे कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो. सायबर यंत्रणेने तत्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. तसेच तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची थट्टा करणारे मॅसेज काही लोकांकडून व्हायरल करण्यात येत आहे. यातून शरद पवार यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar angry on Cyber cell