साताराः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. साताऱ्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार भावूक झाल्याचं पहायला मिळालं. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीची माहिती ऐकत असतांना पवार गहिवरले.
सातारा येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रमासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान चेअरमन अनिल पाटील हे रयत शिक्षण संस्थेची माहिती देत होते. रयत शिक्षण संस्थेचं कामकाज, आजवर केलेली कामं, पवारांचं योगदान; याबद्दल बोलत पाटील बोलत होते. हे ऐकत असतांना शरद पवार भावूक झाले होते. 'साम' टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या कार्यक्रमादरम्यान बोलतांना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचं पवार म्हणाले. भाजपमध्ये गेलेल्या लोकांवरील केसेस मागे घेतल्या जातात आणि इतर पक्षांच्या लोकांवर कारवाई होते, हे यंत्रणांचा गैरवापर करण्याचा सिद्ध होत असल्याचं पवारांनी सांगितलं.
कसब्यात भाजपला नाकारलं- पवार
कसबा पेठ मतदारसंघ जो भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, तेथील लोकांनीच भाजपला नाकारलं आहे. कसब्यात भाजपला मतदान झालं नाही. रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. असंही शरद पवारांनी बोलतांना नमूद केलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.