
Sharad Pawar Death Threat : जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, चिंता...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज ट्विटरवरून जीवे मागण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचा दाभेळकर होणार अशा शब्दात त्यांना धमकी देण्यात आली होती. आता या प्रकरणावर पहिल्यांदाच शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar Death Threat Update)
मिळालेल्या धमकीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्याची कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन आवाज कोणाचा बंद करू शकेल असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे.
प्रश्न फक्त एकच आहे, महाराष्ट्र सरकारवर ही जबाबदारी आहे आणि महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा, पोलिसदल यांच्या कतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्याची चिंता मी करत नाही. पण त्यासोबतच राज्याची सुत्रे ज्यांच्या हातात आहेत त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.
राज्यात खळबळ
दरम्यान शरद पवारांनी मिळालेल्या धमकीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यान राजकीय पातळीवर मतभेद असतील पण मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी येणं खपवून घेणार नाही. कायद्याप्रमाणे पोलिस निश्चित कारवाई करतील. सभ्येतेच्या मर्यादा ओलांडणे खपवून घेणार नाही. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
धमकी कोणी दिली..
शरद पवारांनी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकांउटवरून तुझा दाभोशळकर होईल अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या ट्विटर अकाउंटच्या बायोमध्ये मी भाजपचा कार्यकर्ता आहे असे देखील सांगण्यात आलं आहे. दरम्यान तो भाजपचा असो की काँग्रेसचा असो की राष्ट्रवादीचा असो… धमकी देणं हे आमच्या रक्तात नाही. जो असेल त्याला अटक केली पाहीजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.