Sharad Pawar : 'शरद पवार गो बॅक' पवारांच्या दौऱ्याला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar go back local organizations oppose pawars visit to parner ahmednagar

Sharad Pawar : 'शरद पवार गो बॅक' पवारांच्या दौऱ्याला विरोध

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पारनेरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, 'शरद पवार गो बॅक' अशी घोषणा देत स्थानिक संघटनांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. (sharad pawar go back local organizations oppose pawars visit to parner ahmednagar )

निघोज येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा व विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार गो बॅक म्हणत या दौऱ्यांला विरोध केला जात आहे.

शरद पवार यांच्या या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने विरोध दर्शवला होता. समितीकडून कारखान्याच्या विक्रीत पवारांचा हात असल्याचा आरोप केला होता. कारखाना बचाव समितीकडून ‘शरद पवार-गो बॅक’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर रात्री जवळे ते देवीभोयरे रस्त्यावर ‘शरद पवार-गो बॅक’ असे लिहून आपली नाराजी कारखाना बचाव समितीने व्यक्त केली आहे. या आंदोलनाला भुमिपूत्र शेतकरी संघटना, भीम आर्मी , अन्याय निर्मुलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या सामाजिक संघटनांनी देखील पाठींबा दिला आहे.

मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा कारखाना बचाव समितीने केली आहे.

टॅग्स :Sharad Pawar