Sharad Pawar Birthday: “आनंद दिघेंना जामिनासाठी शरद पवारांनी मदत केली”, आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Sharad Pawar Birthday: “आनंद दिघेंना जामिनासाठी शरद पवारांनी मदत केली”, आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा

शरद पवार आणि आनंद दिघे यांच्यातील राजकीय मैत्रीचा एक किस्सा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला आहे. आनंद दिघे यांच्यावर जेव्हा ‘टाडा’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी आनंद दिघे यांना जामीन मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मदत केली होती. जर शरद पवार यांनी मदत केली नसती, तर आनंद दिघे कधीच ‘टाडा’च्या बाहेर आले नसते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि सध्याचं चालु असलेलं ठाण्यातील राजकारण यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “ठाण्याच्या राजकारणामध्ये स्त्रियांना वापरण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच पार पडला. ठाण्यात असं कधीही झालं नव्हतं. याउलट आनंद दिघे यांना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती, हा ठाण्याचा इतिहास आहे. शरद पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे ‘टाडा’च्या बाहेर आले नसते. ज्यांनी आनंद दिघेंना बघितलंय आहे, त्यांना हे बरोबर माहीत आहे.”असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

हेही वाचा: Sharad Pawar Birthday : जेव्हा पवारांच्या डोळ्यात सुशीलकुमार शिंदेंसाठी अश्रू उभे राहिले

“त्याचबरोबर आनंद दिघेंची जेव्हा सुरक्षा व्यवस्था काढली होती, तेव्हा पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते. त्यावेळी आनंद दिघेंनी पद्मसिंह पाटलांची भेट घेतली होती. माझी सुरक्षा काढू नका, अशी विनंती आनंद दिघे पद्मसिंह पाटलांना केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद दिघेंना जशी होती तशीच सुरक्षा व्यवस्था परत देण्यात आली होती. याच्यासाठी फार मोठं मन आणि मोठा अनुभव लागतो” असंही आव्हाड म्हणालेत.

हेही वाचा: Sharad Pawar Birthday : या निवडणुकीत शरद पवारांनाही करावा लागला पराभवाचा सामना!

टॅग्स :Sharad PawarBirthday