महाराष्ट्रातील ३९ जण उझबेकिस्तानमध्ये अडकले; शरद पवारांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र!

टीम ई-सकाळ
मंगळवार, 17 मार्च 2020

उझबेकिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी १३, पुण्यातील ११, कोल्हापूर आणि नाशिकचे प्रत्येकी १ असे एकूण ३९ जणांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे देशातील तसेच परदेशी व्यापार आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. सर्व प्रमुख देशातील दळणवळण व्यवस्था थंडावली असल्याने अनेक देशांमध्ये भारतीय अडकून पडले आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आता परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे. उझबेकिस्तानची राजधानी असलेल्या ताश्कंद शहरात जे ३९ भारतीय प्रवासी अडकले आहेत, त्यांना मायदेशी आणण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला मोठा निर्णय!

उझबेकिस्तानला गेलेले भारतीय हे आपल्या नियोजित दौऱ्यानिमित्ताने तिकडे गेले होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने त्यांचा परतीचा प्रवास खडतर झाला आहे. ताश्कंदमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये डॉक्टरांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक आणि पुण्यातील काही डॉक्टर १० मार्चला उझबेकिस्तानला गेले होते. मात्र, त्यांना मायदेशी येण्यासाठी विमाने उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांना मायदेशी आणण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र पवार यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठविले आहे. 

- राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी इराणमधील जवळपास २३४ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले होते. मात्र, उझबेकिस्तान सरकारने स्थानिक विमान उड्डाणे बंद केली आहेत. तेथील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. मात्र, कोरोना व्हायरच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याने ते सर्वजण घाबरले आहेत. या सर्वांचे कुटुंबीयही काळजीत पडले आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे पवार यांनी केली आहे.

- Corona Effect : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; 'या' तिकिटांच्या दरांत वाढ!

शरद पवार यांच्यानंतर आता सांगलीचे खासदार संजय पाटील यांनीही परराष्ट्र खात्याशी पत्रव्यवहार केला. उझबेकिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी १३, पुण्यातील ११, कोल्हापूर आणि नाशिकचे प्रत्येकी १ असे एकूण ३९ जणांचा समावेश आहे.

No photo description available.


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: sharad pawar letter to external affairs for airlift Indians from uzbekistan