Sharad Pawar: शिवसेना संपवण्याचाच हिशोब होता अन्...; पवारांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटाने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar News

Sharad Pawar: शिवसेना संपवण्याचाच हिशोब होता अन्...; पवारांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटाने खळबळ

राज्यात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजप यांच्या नात्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखामुळे राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. (sharad pawar Lok Maze Sangati bjp shivsena 2019 maharashtra politics )

लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दुसरा भाग २ मे रोजी प्रकाशित होत आहे. या दुसऱ्या भागामध्ये शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. 'स्वबळावर सत्ता मिळवून सेनेचं ओझ उतरवण्याचा भाजपचा चंग होता.' असा गौप्यस्फोट पवार यांनी या पुस्तकात करत महाविकाआघाडीचा जन्म कसा झाला हे सांगितलं आहे.

पुस्तकात नेमंक काय म्हटलं आहे?

टी व्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, 2019 साली भाजप शिवसेनेतलं अंतर का वाढलं? याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला त्याच्या पुस्तकातून आहे. शिवसेनेचं उच्चाटन केल्याशिवाय आपलं वर्चस्व वाढणार नाही.

शिवसेनेला संपवल्याशिवाय भाजप वाढणार नाही. हाच हिशोब होता. स्वबळावर सत्ता मिळवून सेनेचं ओझ उतरवण्याचा भाजपचा चंग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंमध्ये शिवसेनेविषयी सहानभूती नव्हती. त्यामुळे भाजप- शिवसेना यांच्यातीव वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होत. असही पवार म्हणाले आहेत.

पुस्तकात पवारांचा धक्कादायक दावा

राज्यात १७१ जागा शिवसेना आणि ११७ जागा भाजप लढत असे. मात्र, २०१९ ला सेनेला १२४ जागा सोडत भाजपनं १६४ जागा पदरात पाडून घेतल्या. स्वतःच्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचा चंग अतिआत्मविश्वासात दंग असलेल्या भाजपनं बांधला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. परंतु त्यांना भाजपमध्ये विलीन करुन शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यात आलं. असा दावा पवार यांनी पुस्तकात केला आहे.

तसेच, राज्यातल्या ५० विधानसभा मतदार संघात युतीसमोर बंडखोराचं आव्हान होतं. बहुतांश बंडखोरांनी ठोकरेले दंड नेत्यांच्या आशीर्वादानं पक्षाच्या पाठबळावरच होते. नरेंद्र मोदी, अमित शाह दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून, विधानांतून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती प्रतीत होत नव्हती. बदलत्या परिस्थितीतही उद्धव ठाकरेंची भाजप नेत्यांनी मातोश्रीवर येत संवाद साधण्याची अपेक्षा ठाकरेंना होती.

शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागांतून तिचं उच्चाटन केल्याशिवाय राज्यात निर्विवाद वर्चस्व स्थापन करता येणार नाही असा भाजपचा राजकीय हिशेब होता. भाजप आपल्या अस्तित्वावर उठला आहे असा तीव्र संताप शिवसेनेत होता. मात्र सत्तेत एकत्र असल्यामुळं उद्रेक झाला नाही. परंतु आग धुमसत होती. असा दावा शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाच्या दुसऱ्या भागत केला आहे. अशी माहिती टी व्ही ९ वृत्तवाहिनीने दिली.