कर्जमाफीसाठी पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 मे 2019

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याची गरज व ती कशा पद्धतीने देता येईल, यावर चर्चेसाठी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिली.

मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याची गरज व ती कशा पद्धतीने देता येईल, यावर चर्चेसाठी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिली.

महाराष्ट्रात दुष्काळाची छाया आहे. शरद पवार दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. पवार यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली आहे. चारा छावण्या असतील किंवा जनावरांना पाण्याची व्यवस्था असेल याकडे सरकारने पाहिजे तसे लक्ष दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या बागा सुकल्या आहेत. या बागा सुकल्यामुळे येणाऱ्या काळात त्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी पक्षाची आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Meet to Chief Minister for Loan Waiver