बॅंक पदाधिकाऱ्यांबाबत आततायीपणा - पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे - डीएसके गैरव्यवहारप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांनी आततायीपणा केलेला दिसतो. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकारात पोलिसांनी हस्तक्षेप केला असून, कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

एमपीएससीच्या उमेदवारांकडून मोर्चे काढले जात आहेत. त्यावर ते म्हणाले, ‘‘ विविध पदांच्या आवश्‍यक जागा निर्माण होतात की नाही हे पाहण्याची आमच्यासारख्या राजकीय लोकांची जबाबदारी आहे. त्याविषयी चर्चा केली जाईल.’’

आठ हजार रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी उर्वरित पन्नास टक्के रक्‍कम शिक्षण संस्थांना दिली पाहीजे. ती दिली नाही तर शिक्षक आणि इतरांचे वेतन संस्था कोठून देणार? सरकारने निधी देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.

Web Title: Sharad pawar Press conference DSK fraud case Bank of Maharashtra