
Uddhav Thackeray: माझा सल्ला पवारांना पचनी पडला नाही तर...उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला त्यांच्या अंतर्गत बदल करण्याचा अधिकार असतो. महाविकासआघाडीला तडा जाईल असं राष्ट्रवादीत काही घडेल असं मला वाटत नाही. शरद पवार यांच्या निर्णयानंतर मी बोलेन असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तुमचा त्यांच्याशी संवाद झाला आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला.
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांना अधिकार आहे काय करायचं. पवार सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेतील. मी शरद पवार यांना सल्ला कसा देऊ? माझा सल्ला पवारांना पचनी पडला नाही तर मी काय करु? असा सवाल उपस्थित केला. पवारांच्या निवृत्तीचा निर्णय अंतिम निर्णय नाही.
मुंबईबाबत माझ्या मतावर मी ठाम आहे. माझी मते मी मांडली आहेत. मविआला तडा जाईल असं मी बोलणार नाही. मला व्यक्तीचा नाही तर वृत्तीचा पराभव करायचा आहे. हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. असही ठाकरे यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनंतर कार्यत्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आंदोलन केले आहे.