महाराष्ट्रात महाविकासआघाडीचेच सरकार : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे आहे असा पुर्नरुच्चार माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे केला.

 

कऱ्हाड : भाजपला बहुमत नव्हते म्हणून त्यांनी सरकार बनवले नाही. त्यांनी राज्यपालांना सुरवातील जाऊन आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही सरकार बनवु शकत नाही असे लेखी दिले आणि आता त्यांनी सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा उल्लेख केलेला असावा असे दिसते. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे व्यक्तीगत दोन-तीन लोक गेले असतील. मात्र पक्षाचा पाठिंबा त्यांना नाही. त्यामुळे पक्ष म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी नाही. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मात्र काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेचेच सरकार येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे आहे असा पुर्नरुच्चार माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे केला.

महाविकासआघाडीकडे 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र; राजभवनात सादर 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनाठी आल्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज पदाची सुत्रे स्विकारणार त्यावर पवार म्हणाले, शपथ घेतल्यानंतर सुत्र ही स्विकारायची असतात. मात्र ही निवड वैध आहे की नाही हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र घटनेनुसार त्याला पाठिंबा लागतो तो पुरेसा आहे की नाही हे राज्यपालांनी 30 तारखेपुर्वी बहुमत स्पष्ट करायचे असल्याने नजरेसमोर येईल.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपला बहुमत नव्हते म्हणून त्यांनी सरकार बनवले नाही. त्यांनी राज्यपालांना सुरुवातील जावुन आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही सरकार बनवू शकत नाही असे लेखी दिले आणि आता त्यांनी सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा उल्लेख केलेला असावा असे दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या बैठका सुरु आहेत. व्यक्तीगत दोन-तीन लोक गेले असतील. मात्र पक्षाचा पाठिंबा त्यांना नाही. पक्षाचे धोरण नाही. त्यामुळे पक्ष म्हणुन आम्ही त्यामध्ये सहभागी नाही. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

सत्ता नसेल तर भाजपवाले वेडे होतील : संजय राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar says in Maharashtra MahavikasAghad government will be form