'मानवाधिकारांच्या अहवालाबाबत PM मोदींना बोलण्याची संधी होती, पण...'

अमेरिकेच्या अहवालानंतर पंतप्रधान मोदींना आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी होती, पण..
Political News
Political News
Summary

अमेरिकेच्या अहवालानंतर पंतप्रधान मोदींना आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी होती, पण..

एस. जयशंकर आणि राजनाथ सिंह या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित एका पत्रकार परिषदेत भारतात मानवाधिकारांचं उल्लंघन होतं असल्याचा अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मांडला. अमेरिकेच्या अहवालानंतर पंतप्रधान मोदींना आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी होती. पण, त्यांनी ती संधी घेतली की नाही हे माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Political News
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून राज ठाकरेंची सभा : जितेंद्र आव्हाड

आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी पंतप्रधान मोदींकडे संधी होती. ती त्यांनी घ्यायला पाहिजे होती. त्यांनी घेतली की नाहीतर माहिती नाही. त्यांनी ही संधी घेतली असेल तर अभिनंदन, असंही शरद पवार म्हणाले.

अहवालात नेमकं काय?

भारतात मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे. सरकारी अधिकारी आणि तुरुंगातील अधिकाऱ्यांकडून हे उल्लंघन केलं जात आहे, असा अहवाल पत्रकार परिषदेत अमेरिकेने मांडला. याकडे गांभिर्यान पाहणं आवश्यक आहे. पोलिस आणि तुरुंगातील अधिकारी, सरकारी अधिकाऱ्यांकडून मानवधिकारांचं उल्लंघन केलं जातं आहे. फक्त गरीबांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन होतं आहे. मोठ्यांचे मानवाधिकार जपले जातात. माध्यामांच्या स्वातंत्र्यांवर गदा आणली जाते, असं अहवालामध्ये म्हटलं आहे. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांच्यासमोर हा अहवाल मांडण्यात आला.

Political News
'विश्वास नांगरे-पाटलांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही'

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल उत्तरसभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी प्रतित्त्युर दिले आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांचं वक्तव्य गांभीर्याने घेणार नाही. कारण त्यांनी केलेला आरोप खोटा आहे. शिवरायांना घडवण्यात राजमाता जिजाऊंचं योगदान मोठ आहे. राज ठाकरे यांच्या उत्तर कालच्या सभेत सामान्यांचा एकही प्रश्न नव्हता. भाषणात त्यांनी महत्वाच्या मुद्द्यांना बगल दिली असल्याचे पवारांनी म्हटलं आहे. महागाईबाबत राज ठाकरे गप्प का असा सवालही शरद पवार यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com