सोनियांशी झालेल्या चर्चेनंतर शरद पवारांनी दिले मुख्यमंत्रीपदावर स्पष्टीकरण; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत त्यांच्याविषयी चाललेल्या चर्चांना विराम दिला असून राज्यत परतणार नाही असे सांगितले.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत त्यांच्याविषयी चाललेल्या चर्चांना विराम दिला असून राज्यत परतणार नाही असे सांगितले.

पवार म्हणाले, की सध्यातरी आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नाही. पण भविष्यात काय होईल, काही सांगू शकत नाही. आम्हाला अद्याप पाठिंब्यासाठी कुणीही विचारलेलं नाही. त्यामुळे त्याविषयी काही माहीत नाही. शिवसेनेने १७० आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला माहीत नाही’

सरकार बनविण्याची जबाबदारी भाजप शिवसेनेची; पण...- शरद पवार

पवार पुढे म्हणाले की, ‘सोनिया गांधींशी भेट घेतली. ए. के. एंटनी देखील उपस्थित होते. राज्यातील परिस्थिती त्यांना विशद करून सांगितली. त्यावर अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. शिवसेना सामनामधून भाजपविरोधात सातत्याने टीका करत आहे. त्याशिवाय, ते वारंवार म्हणत आहेत की त्यांच्या अटींनुसार सरकार स्थापन व्हावं. या सगळ्याविषयी मी सोनिया गांधींनी माहिती दिली. त्यावर आम्ही असं ठरवलं आहे की पुन्हा एकदा भेटायचं. उद्या मी मुंबईला परतणार आहे. तिथे माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यानंतर पुन्हा मी सोनिया गांधींची भेट घेईन.

आजतरी मतदारांनी विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे. पण आपण काय होईल ते सांगू शकत नाही. पर्यायी सरकार देण्यासाठी आजतरी आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नाही’, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar speak after he meets Congress President Sonia Gandhi